March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.9) – तिसगाव येथील विस्डम इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महापुरुष व कर्तबगार महिला विषयी मार्गदर्शन, विद्यार्थी विद्यार्थिनींची भाषणे, महिलांसाठी नृत्य व विविध स्पर्धा आदी विविध कार्यक्रम शनिवारी (ता.8) रोजी घेण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुभद्राबाई पांडूरंग काळे, मनकर्णाबाई नामदेव राऊत, शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा अकबरबेग, शाळेचे संचालक अजगर बेग, संचालिका इश्रत बेग यांच्या प्रमुख उपस्थितीत महापुरुषांना अभिवादन करून उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी महिला सशक्ततीकरण, नारीशक्ति, महिला सुरक्षा व आजच्या परिस्थितीत महिलेचा प्रत्येक ठिकाणी उच्चांक पाहता भारतातील महिला पंतप्रधान, राष्ट्रपती, आयपीएस, आयएएस, पीआय, पीएसआय, आमदार, खासदार, शिक्षण श्रेत्रात , सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात महिला यावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विविध वेषभूषा परिधान करून भाषणे करत समाजात समता, एकात्मतेचा संदेश दिला. जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढलेले स्री प्रगतीचे प्रतीक म्हणुन भव्य रांगोळीतून संदेश दर्शवण्यात आले. तसेच महिलांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने संगीत खुर्ची, नृत्य, रस्सीखेच अशा विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या चेतना पटेल, पूनम पाटील, अश्विनी उगले, वंदना चावरे, निशिगंधा तायडे, स्नेहल पाटील, ज्योती कापसे, शुभांगी बावीस्कर, कविता काटापले, आरती डहाळे, शितल खैरनार, कावेरी खेडकर, ज्योती गायके, गायत्री पवार, सारिका पवार, पूजा कवडे, मयुरी वानखडे, बालिका कांबळे, मीनाक्षी परदेशी, व शाळेचे क्रीडा विभागप्रमुख प्रा. कैलास जाधव व श्याम जाधव यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *