
वाळूजमहानगर, (ता.9) – स्कुटी पार्किंगमध्ये लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर एका महिलेसह चार जणांनी 37 वर्षीय शिक्षिकेच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्ये करून तिचा विनयभंग केला. तसेच मारहाण करून धमकी देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सिडको वाळूजमहानगर -2 येथे शुक्रवारी (ता.7) रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, साऊथ सीटी सिडको महानगर -2 ता. जि.छत्रपती संभाजीनगर येथील 37 वर्षीय महिला शिक्षिका तिचा पती, दीर, जाऊ व सासू असे शुक्रवारी (ता.7) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरासमोर बसलेले होते. त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या प्रगती जांभुळकर यांच्यासोबत स्कुटी लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता. लोकांनी समजावुन सांगीतल्याने त्यांचे भांडण मिटले होते. परतु नंतर प्रगती जांभुळकर हीने तीचा नातेवाईक सुनिल जयवाल याला बोलवुन घेतले. त्यानंतर विकास जांभुळकर, नितीन काळे हे शिक्षिकेच्या पती व दिर यांना शिवीगाळ करुन हाताचापटाने मारहान करत असताना शिक्षिका सोडविण्यासाठी गेली असता सुनिल जयवाल याने हात धरुन, गळ्याजवळ ड्रेस पकडुन ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. व मला शिवीगाळ करुन मला माहीत आहे की, तु कोणत्या शाळेमध्ये जाँब करते, तुला बघुन घेतो अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी प्रगती जांभुळकर, विकास जांभुळक, नितीन काळे सर्व रा. साऊथ सीटी सिडको महानगर -2 व सुनिल जयवाल रा. राजणगांव (शेणपुंजी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
RK NEWS LIVE का app आ गया है । सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे – Powered by Kutumb App
https://kutumbapp.page.link/uxhnU2vjZpuwiQP58
दुसऱ्या दिवशीही व्हिडिओ व्हायरल –
वाळूज परिसरातील जोगेश्वरी येथे 14 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या कारणावरून जाब विचारणाऱ्या कुटुंबाला तीन तरुणांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिडको वाळूज महानगर -2 येथे जोगेश्वरी सारखीच घटना घडली. आणि त्या घटनेचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला. विनयभंग व मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही एकापाठोपाठ दुसरी घटना आहे. त्यामुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
