
वाळूजमहानगर, (ता. 5) -वळदगावच्या उपसरपंचपदी प्रीती मनीष शिंदे यांची सोमवारी (ता. 3) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. विष्णु रंगनाथ झळके यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती.
वडगाव येथील उपसरपंच निवडीसाठी सोमवारी (ता.3) रोजी ग्रामपंचयात कार्यालयात सरंपच अमरसिंग डांगर यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त जागेवर निवडणुक प्रकिया पार पडली. यावेळी प्रीती शिंदे यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले. यावेळी अध्यासी अधिकारी शेखर शिंदे, तलाठी स्वत्नील शेळके, ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद रिंढे यांनी निवडणुक प्रक्रियेचे काम पाहिले. यावेळी माजी उपसरपंच संजय झळके, विष्णू झळके, माजी पंचायत समिती सदस्य गणेश नवले, ग्रामपंचायत सदस्य अशोक खोतकर, वैशाली खोतकर, मनेश शिंदे, प्रशांत पहाडिये, रितेश पहाडीये, भगवान पवार, राधा मरमट, शेख चांद पाशा इस्माईल, राजू मुसळे, नितेश चुंगडे, शफी शेख चांद यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.
