वाळूजमहानगर, (ता.2) – बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनी प्लॉट नंबर एक्स.147 येथील दारूचा बार (परमिट रूम ) त्वरित हटवा. या मागणीसाठी रविवारी (ता.2) मार्च रोजी इंद्रप्रस्थ सेवाभावी संस्था व इंद्रप्रस्थ कॉलनीतील नागरिकांच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे.
बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनीच्या नागरिकांचा या बियरबारला (परमिट रूम) विरोध असतानाही येथे बियर बार होत आहे. याबाबत शासन दरबारी अनेकदा आंदोलन व पत्रव्यवहार करून सुद्धा दखल घेतली नाही. तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सुद्धा अनेक पुढाऱ्यांनी आश्वासन देऊन सुद्धा ते पाळले नाही. त्यामुळे येथील मतदारांमध्ये नेते मंडळ विरुद्ध नाराजीचा सूर दिसून येत आहे. सकाळी 10. 30 वाजता इंद्रप्रस्थ कॉलनी येथे हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती इंद्रप्रस्थ सेवाभावी संस्थेचे जगन्नाथअण्णा कोळी यांनी दिली. तसेच या आंदोलनात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे. असे आवाहनही त्यांनी केले आहे.
