
वाळूजमहानगर, (ता.1) – गरवारे कम्युनिटी सेंटरच्या वतीने विविध गटात घेण्यात आलेल्या सूर्यनमस्कार स्पर्धेत रांजणगाव शेणपुंजी येथील श्री गजानन विद्या मंदिर व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
गरवारे कम्युनिटी सेंटर मार्फत आयोजित विभागीय सूर्यनमस्कार स्पर्धेत रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरच्या प्राथमिक विभागातून 1 ली ते 4 थी गटातून मुले व मुली यांचा संघ प्रथम तसेच 5 वी ते 10 वी गट मुले तृतीय व मुली द्वितीय क्रमांक तसेच बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूलचा पहिली ते चौथी गटातील मुले तृतीय व मुलीने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच पाचवी ते दहावी गटातील मुलांनी प्रथम तर मुलींनी द्वितीय क्रमांक पटकावला. या सूर्यनमस्कार स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक जब्बार पठाण, शहाजी मंगनाळे, विजया पवार, प्रीती नरवाडे, कल्याण कुलकर्णी, गंगासागर बोराडे, अनुराधा मुळे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आय.जी.जाधव, संस्थेचे सचिव हरीश जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक हनुमंत जाधव, उपमुख्याध्यापक शहाजी मंगनाळे, प्रा.विभाग प्रमुख मनीषा नवथर, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक भाऊसाहेब शिरसाट, रेखा बिदरकर आदींनी स्वागत करत कौतुक केले.
