March 23, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.28) – आंदोलन केल्याने सिडको प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी नागरी समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र सिडकोने त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. याचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवारी (ता. 28) सिडकोच्या देखील आश्वासनाचे वर्षश्राद्ध घालून आगळेवेगळे आंदोलन केले. दरम्यान वर्पे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको वाळुज महानगरातील विविध नागरी समस्या सोडवाव्या यासाठी ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये सिडको कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेत सिडको प्रशासनाने समस्या सोडविण्याबाबतचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्ष झाले तरीही समस्या न सोडवल्यामुळे व दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे सिडकोचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दत्तात्रय वर्पे याने शुक्रवारी (ता. 28) सिडको कायार्लयासमोरच सिडकोच्या आश्वासनाचे वर्षश्राद्ध घालून आंदोलन केले.

कार्यलयात येणाऱ्यांना अडथळा, वर्पेविरुद्ध गुन्हा –
याबाबत सिडकोचे कार्यकारी अभियंता कपिल राजपुत यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लेटरहेडवर दत्तात्रय वर्पे उपशहरप्रमुुख वाळूजमहानगर 1 यांनी मुख्य प्रशासक यांच्या नावे लेखी पत्र दिले होते. यात त्यांनी म्हटले होते की, वाळूजमहानगर येथील समस्या मार्गी लावण्यासंर्दभात सिडकोने आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्ष होऊन सुध्दा आश्वसनाची पुर्तता केली नाही. त्यामुळे सिडकोने नागरीकांची फसवणुक केल्याच्या निषेधार्थ वर्पे याने शुक्रवारी सकाळी सिडको कार्यलयासमोर निषेधाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे सिडकोने वरपे यांना लेखी कळवले होते की, सिडको वाळूज महानगर भागात हाती घेण्यात आलेल्या कामांची व मूलभूत सुखसुविधा या कामाची यादी तयार केली आहे. ही कामे तात्काळ मार्गी लावत आहोत. त्यामुळे सिडको कार्यालयासमोर आयोजित केलेला कार्यक्रम स्थगित करून कार्यालयासमोर कोणत्याही प्रकारचे धरणे आंदोलन व निषेध व्यक्त करू नये. असे कळविले होते. मात्र तरीही वरपे यांनी कार्यालयासमोर पुजापाठ सुरू केली. त्यामुळे गर्दी जमा झाल्याने कार्यालयात येणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण झाला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दत्तात्रय वर्पे याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *