March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.26) – रात्री जेवण केल्यानंतर कुटुंबासह घरात झोपलेला 34 वर्षीय तरुण कोणास काही एक न सांगता घरातून 19 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाला.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आदिनाथ रामनाथ साबळे (वय 34) रा. शिवराई ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर हा बजाज कंपनीमध्ये नोकरी करतो. 19 फेब्रुवारी रोजी रात्री घरातील सर्वजण झोपलेले असताना आदिनाथ हा घरातून निघून गेला. त्यानंतर रात्री उशीरापर्यत तो घरी आला नसल्याने व त्याचेकडे मोबाईल फोन नसल्याने त्याचा शेजारी, नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र तो अद्याप मिळुन आला नाही. याप्रकरणी रामनाथ वामनराव साबळे वय 70 वर्ष यांच्या खबरीवरून वाळूज पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार भीमराव शेळके हे त्याचा शोध घेत आहे.
बेपत्ता मुलाचे वर्णन असे –
अदिनाथ रामनाथ साबळे (वय 34), उंची 5 फुट 5 इंच, रंग सावळा, बांधा मध्यम, केस काळे, अंगात लाल रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट, पायामध्ये सॅन्डल, भाषा मराठी बोलतो.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *