February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.26) – बजाजनगर येथील आर. एक्स. 1/11 हरिओम हाउसिंग सोसायटी येथे महाशिवरात्री निमित्त महिलांच्या वतीने शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करण्यात आले. तसेच दररोज हरिपाठ, भजन, आरती, गवळण असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.

येथील शिवलीलामृत पारायणात वनिता देशकर, रक्तमाला पाथ्रीकर, नंदा पानझाडे, गायत्री मैलापुरे, अनुराधा पानझाडे, लक्ष्मी सूर्यवंशी, अर्चना टिळेकर, गौरी टिळेकर, ज्योती काळे, आशा जायभाये, मीना चौधरी, मंदोदरी केंद्रे, शीतल जाधव, वंदना कांदे, जया शेलार, मनीषा शेलार, अंजना नाईकनवरे, मंगल वाघमारे, आदी भाविक महिला सहभागी झाल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नरेश देशकर, शुभम काळे, भीमराव टिळेकर, मधुकर पानझाडे, भास्कर नाईकनवरे यांच्यासह हरिओम हाऊसिंग सोसायटी, अक्षर हाऊसिंग सोसायटी, जय तुळजाभवानी हाउसिंग ग्रुप, देवगिरी हाउसिंग सोसायटी, औदुंबर हाऊसिंग ग्रुप येथील रहिवासी परिश्रम घेत आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *