February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.26) – लोखंडी ग्रील मधून घरात प्रवेश करून घरातील टिव्ही, दोन घडयाळ, देवघरातील पैसे, व घरातील ड्रावरमध्ये ठेवलेली कारची चावी घेवून कारसह घरातील साहित्य चोरून घेवून गेलेल्या दोन आरोपींना वाळुज एमआयडीसी पोलिसांनी 24 तासाच्या आत कळवण, नाशिक येथून ताब्यात घेऊन 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरासमोर राहणाऱ्या संजय बालाजी देशपांडे (वय 50) यांच्या घराची लोखंडी ग्रील तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील टीव्ही, दोन घड्याळी, देवघरात ठेवलेले पैसे. असे घरातील साहित्य त्यांनी घेतले. तसेच ड्रावरमध्ये ठेवलेली कारची चावी काढून घरासमोर लावलेली महागडी कार (एम एच 20, एफ यु -2208) घेऊन नाशिककडे निघून गेले. 24 फेब्रुवारी रात्री साडेनऊ ते 25 फेब्रुवारी सकाळी सात वाजे दरम्यान झालेल्या या चोरीची फिर्याद मिळताच वाळुज एमआयडीसी पोलिसांनी शोध सुरू केला. दरम्यान गोपणीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चोरी गेलेली कार कळवन जिल्हा नाशिक येथे आहे. त्यामुळे वाळुज एमआयडीसी पोलीसांच्या एका पथकाने नाशिक येथे जाऊन चोरीस गेलेली कार व आरोपी ताब्यात घेतले. राजेश शामशंकर शर्मा, (वय 30 वर्षे), रा. आनंदवाडी सुभाषनगर मनमाड जि. नाशिक. (मुळ पत्ता देवी मंदिराच्या मागे, पंडितनगर ता. जि. गोरखपुर उत्तर प्रदेश) व श्रीराम सोमनाथ सोनवणे, (वय 22 वर्षे), धंदा- रा. जातेगाव (वाकला) ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांना ताब्यात घेवून आरोपीकडून चोरी केलेली चारचाकी कार जप्त केली.

यांनी केली कामगिरी –

ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त नितीन बागटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सपोनि. मनोज शिंदे, पोउपनि. प्रविण पाथरकर, पोलीस हवालदार जालिंद रंधे, सुरेश कचे, बाळासाहेब आंधळे, यशवंत गोवाडे, हानुमान ठोके, नितीन इनामे, समाधान पाटील, वैभव गायकवाड, शिवनारायण नागरे, लखन गुसिंगे, राजाभाऊ कोल्हे यांनी केली.
चोरीची कार नजर कैदेत –
बजाजनगर येथून चोरी झालेली महागडी कार नाशिक, कळवण येथे असल्याची माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी पोलिसांनी कळवण पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कळवन पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारानी चोरीची कार नजर कैदेत ठेवली. त्यामुळे चोरीतील आरोपी व मुद्देमाल पोलिसांना मिळाला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *