February 5, 2026

 

 

वाळूजमहानगर, (ता.26) – बजाजनगर येथील पंचगंगा हाऊसिंग सोसायटीत महाशिवरात्रीनिमित्त यज्ञयाग, अभिषेक, आरती, भजन, भंडारा आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महादेव मुर्तीची प्रतिष्ठापना (ता.25) रोजी करण्यात आली.

बजाजनगर येथील पंचगंगा हाऊसिंग सोसायटीत महादेव मंदिर बांधण्यात आले. महाशिवरात्रीचे औचित्य साधून या मंदिरात महारूद्र मठपती महाराज यांच्या हस्ते महादेवाच्या पिंडीसह घंटा, त्रीशूळ, गळती भांडे, नंदी आदींची स्थापना मंगळवारी (ता.26) रोजी करण्यात आली.
यावेळी यजमान सचिन बेदरे व पंचगंगा हाउसिंग सोसायटीतील नागरिकांच्या वतीने अभिषेक, आरती व भजन आदी कार्यक्रम दिवसभर घेण्यात आले. उद्या बुधवारी (ता.26) रोजी महाशिवरात्री निमित्त शाबुदाणा खिचडी फराळ व गुरुवारी (ता.27) रोजी महाप्रसाद (भंडारा) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला पंचगंगा सोसायटीचे अध्यक्ष माधव पाटील घोरबांड, अमोघनाथ प्रजापती, नारायण भाले, संतोष ढाले, बाळू नलावडे, भास्कर कदम, श्रीमंत ठोंबरे, सचिन बेदरे, सूभाष हरने, जगन्नाथ पाटील, माणीकराव पारवेकर, स्वाती घोरबांड, सुषमा प्रजापती, कमल नलावडे, उर्मीला बेदरे, मेघा शेवाळे, सोनी मोतेकर, सविता ढाले, मनीषा पाटिल, तृप्ती हरणे, रेखा आग्रे, माई पाटील, अनूराधा ताई, कल्पना गुट्टे, चंदनबाला शेलार, जया चोपडे, स्वाती चोधरी, रूपाली पाटील, अर्चना गायकवाड, सरोजनी ठोंबरे, तेजोस्वानी माळी, वर्षा कदम, कवीता पाटील, वनिता पवार, कार्तीकी मुळे, मिना मोतेकर आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *