March 23, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.25) – जेवण केल्यानंतर बिलाच्या कारणावरून सात ते आठ जणांनी एका 40 वर्षीय हॉटेल मालकास शिवीगाळ व मारहाण करून जखमी केले. ही घटना बजाजनगर येथे रविवारी (ता.23) सायंकाळी घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भगतसिंग महाजन रा. स्वास्तिक सिटी शेखापुर येथे कुटूंबासह राहतो. तो बजाजनगर येथील आंबेडकर चौकात राजनिती नावाचे हॉटेल चालवतो. रविवारी (ता.23) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवनासाठी सुनिल डोळस व त्याच्या सोबत आलेल्या मित्रांनी जेवनाच्या बिलावरून वेटर गौतम गायकवाड याच्या सोबत वाद घातला. त्यानंतर सायकांळी 7 वाजेच्या सुमारास महाजन हे हॉटेलवर असतांना सुनिल डोळस, मुन्ना पाटील, सुशिल (पूर्ण नाव माहित नाही) व त्याचे सोबत चार ते पाच हे तेथे आले. त्यानंतर त्यांनी महाजन यांना हॉटेलच्या बाहेर बोलवून दुपारी झालेल्या वादावरून शिवीगाळ करीत हाताचापटाने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देत तेथून पळून गेले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश तौर करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *