March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.25 – बाहेर जाऊन येतो असे घरी सांगून सकाळी गेलेला बजाजनगर येथील 55 वर्षीय इसम बेपत्ता झाला. ही घटना शुक्रवारी (ता.21) रोजी सायंकाळी उघडकीस आली.


बजाजनगर येथील मोहटादेवी परिसरात असलेल्या अयोध्यानगरातील अशोक राम कांबळे हा 55 वर्षीय इसम शक्रवारी (ता.21) सकाळी 6 वाजेच्या सुमारास बाहेर जाऊन येतो. असे म्हणून घरातून निघून गेला. सायकांळी 5 वाजले तरी तो घरी आला नाही. म्हणुन त्याच्या कुंटूंबियानी वाळूज औद्योगिक परिसरात व नातेवाईकाकडे शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. महिला पोलीस हवालदार रेखा चांदे या त्याचा शोध घेत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *