March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.22) – विविध मागण्या व राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन सेना छत्रपती संभाजीनगर पश्चिमच्या वतीने बजाजनगर येथे शुक्रवारी (ता.21) रोजी मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देत शासनाचा निषेध करण्यात आला.

आंतरजातीय विवाह केल्यामुळे भोर येथील तरुणाची हत्या करणाऱ्या समाजकंटकांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला मदत व एकाला शासकीय नोकरी द्यावी, सोमनाथ सूर्यवंशी मारहाण करणाऱ्या पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा म्हणणाऱ्या आमदार सुरेश धस विरोधात ॲट्रॉसिटी दाखल करण्यात यावा, मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या गुंडांना फाशीची शिक्षा करण्यात यावी, मुख्य सूत्रधार शोधून त्यांनाही कडक शासन करण्यात यावे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, आशिया खंडातील सर्वात मोठी असणाऱ्या वाळुज औद्योगिक क्षेत्रात पुरुष, महिला कामगारांसाठी ठीकठिकाणी शौचालय बांधण्यात यावेत, तसेच बजाजनगर या नागरीवसाहतीमध्ये देखील ठिकठिकाणी शौचालय बांधण्यात यावेत. यासह इतर मागण्या संदर्भात राज्यकर्त्यांचं लक्ष वेधण्यासाठी बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात शुक्रवारी (ता.21) रोजी हे आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन सेनेचे छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी शुद्धोधन मोरे, चंद्रकांत रूपेकर, मिलिंद बनसोडे, महिला आघाडीच्या मनीषाताई साळुंखे, धम्मपाल भुजबळ, बबन साठे, संदीप गायकवाड, नाना सूर्यवंशी, के एस पवार, विनोद वाकोडे, राजेश भालेराव, संदीप जगताप, ज्ञानेश्वर गवळे, ज्ञानेश्वर जाधव, संदीप जाधव, लिलाबाई सोनवणे, अमोल वाघमारे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *