March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.17- मराठवाडा साहित्य परिषद आणि दगडोजीराव देशमुख महाविद्यालय वाळूज यांच्या संयुक्त विद्यमाने 15 व 16 फेब्रुवारी रोजी बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात 44 वे मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते सोमवारी (ता.13) रोजी करण्यात आले.

या बोधचिन्हांमध्ये वाळूज औद्योगिक दर्शन, मराठवाड्यातील शेती, श्रम, संस्कृती आणि कैलास लेणे अशा सांकेतिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेचा हा उपक्रम मराठवाड्यातील लेखक, साहित्यिक, कवी, कथाकार यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. या साहित्य संमेलनामुळे वाळूज महानगरातील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीस बळ मिळणार आहे. याप्रसंगी संमेलन स्वागताध्यक्ष विजय राऊत, स्वागत मंडळाचे विवेक जैस्वाल, सुनील काळे, गणेश घुले, शशिकांत ढमढेरे, मच्छिंद्र सोनवणे, विजय जैस्वाल, मनीष जैस्वाल, प्राचार्य डॉ. राहुल हजारे आदी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *