वाळूजमहानगर, ता.14- बजाजनगर येथील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती रविवारी (ता.12) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, हर्षला जाधव, सहसचिव अमन जाधव, हेमंत पोहनेरकर, रविंद्र देखपांडे, डॉ. प्रेम खेडकर, कैलास चव्हाण उपस्थिती होती. याप्रसंगी सर्व प्रमुख पाहुण्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. संतोष शेळके, प्रशासकीय अधिकारी भागचंद जाधव यांच्यासह शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी मोलाची मदत केली.
