February 5, 2026

वाळूजमहानगर, ता.2 – जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत किराणा दुकान चालवणाऱ्या पती पत्नीला पितापुत्राने मारहाण करून धमकी दिल्याची घटना 1 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव (शेणपुंजी) येथील बाळासाहेब भाऊसाहेब कांगणे हे किराणा दुकाण चालवतात. त्यांच्या बाजुच्या गल्लीत राहणारा किरण राजु निर्मळ हा 1 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास कांगणे यांच्या किराणा दुकाणा समोर आला व जुण्या भांडणाच्या कारणावरून कांगणे यांच्याकडे रागाने पाहून शिवीगाळ करु लागला. शिवीगाळ करण्याबाबत त्यास विचारले असता त्याने आरेरावीची भाषा करून व जोरजोरात ओरडुन त्याच्या वडीलांना बोलावले. त्यावेळी त्याचे वडील राजु निर्मळ हे येतांना हातात लाकडी घेवुन आले. व तेव्हा किरण हा त्यांच्या घरी पळत जावुन लोंखडी पाईप घेवून आला. त्यानंतर त्यांनी लोंखडी पाईप व लाकडी दांड्याने माहराण केली. म्हणुन कांगणे यांची पत्नी सुरेखा या भांडण सोडवण्यासाठी आल्या असता तीला सुध्दा मारहाण केली. दिलीप बन्सी तौर, राजु लहाने, पांडुरंग कवडे यांनी त्यांचे भांडण सोडवले. त्यानंतर मारहाण किरण व राजु निर्मळ यांनी आमच्या विरुध्द पोलिसांनी तक्रार दिली तर तुम्हाला परत मारहाण करु. अशी धमकी दिली. याप्रकरणी बाळासाहेब भानुदास कांगणे, (वय-48), रा. शिवनेरी कॉलणी, रांजणगाव (शेणपुंजी) फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *