March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.25- दोन वर्षाच्या चिमुकलीसह 20 वार्षिय विवाहिता वाळुज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथून बेपत्ता झाली. दोन दिवसांपूर्वी घडलेला हा प्रकार शुक्रवारी (ता.22) रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राम रमेश वावदणे (वय 25), हे 20 वर्षीय पत्नी वैष्णवी व 2 वर्षीय चिमुकली आराध्या यांच्यासह हरिओमनगर, रांजणगाव ता. गगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे राहतात. त्यांना शुक्रवारी (ता.22) रोजी पुणे येथे कुटुंबासह जाणे असल्याने वावदने हे दुपारी 12 वाजेच्या सुमारास पंढरपूर येथील बस स्थानकावर पत्नीची वाट पाहत थांबले होते. तर वावदने यांचे सासरे पुंडलिक हिवाळे यांच्या घरून वैष्णवी व आराध्या निघणार होते. त्यांना रांजणगाव (शेणपुंजी) येथून पंढरपूरकडे जाण्यासाठी हिवाळे यांनी रिक्षामध्ये बसवून दिले. मात्र दोघीही रस्त्यातूनच बेपत्ता झाल्या.त्यांचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र दोघीही मिळून आल्या नाही. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *