वाळूजमहानगर, ता.20 (बातमीदार) –
विधानसभा निवडणुुकीसाठी वाळूज परिसरातील
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पश्चिम विधानसभा तसेच गंगापूर विधानसभेसाठी असलेल्या 133 मतदान बुथवर बुधवारी (ता. 20) रोजी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. दरम्यान पोलीसांनी चौख बंदोबस्त ठेवला आहे.
पश्चीम मतदार संघ –
तिसगाव जिल्हा परिषेद शाळा 2 केंद्र, किशनलाल तापडीया मेमोरीअल स्कुल म्हाडा कॉलनी येथे 2 केंद्र, माता रमाबाई आंबेडकर महिला विधी कॉलेज वाळूजमहानगर -1 येथे 5 केंद्र, योगेश्वरी माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय वडगाव कॉल्हाटी येथे 3 केंंद्र, वडगाव कॉल्हाटी जिल्हा परिषेद शाळा येथे 4 केंद्र, शांताई प्राथिमिक व महाविद्यालय वडगाव कॉल्हाटी येथे 4 केंद्र, बजाजनगरात दगाडोजी देशमुख कला वाणिज्य विज्ञान महाविद्याल येथे 6 केंद्र, राजा शिवाजी माध्यमिक उच्चमाध्यामिक विद्यालय बजाजनगर येथे 7 केंद्र, लाल बहादुर शास्त्री महाविद्यायल बजाजनगर 3 केंद्र, त्रिमुर्ती बालक मंदिर बजाजनगर येथे 6 केंद्र, स्व भैरवमल तनवाणी विद्यालय बजाजनगर येथे 6 केंद्र, अल्फोन्सा इंग्रजी शाळा बजाजनगर येथे 5 केंद्र, साजापूर जिल्हा परिषेद शाळा येथे 6 केंद्र, पंढरपुर जिल्हा परिषेद शाळा येथे 7 केंद्र असे 66 केंद्र आहेत.
गंगापुर- खुलताबाद मतदार संघ –
आंबेगाव जिल्हा परिषेद शाळा 1 केंद्र, खोजेवाडी जिल्हा परिषेद शाळा 1 केंद्र, टोकी जिल्हा परिषद शाळा 1 केंद्र, नाराणपुर खु जिल्हा परिषेद शाळा 1 केंद्र, नांदेडा जिल्हा परिषेद शाळा 1 केंद्र, एकलहेरा जिल्हा परिषेद शाळा 1 केंद्र, अंबेलोहळ जिल्हा परिषेद शाळा 3 केंद्र, वडगाव जिल्हा परिषेद शाळा 1 केंद्र, कासोडा जिल्हा परिषेद शाळा 2 केंद्र, घाणेगाव जिल्हा परिषेद शाळा 4 केंद्र, कमळापुर जिल्हा परिषेद शाळा 2 केंद्र, राजमाता इंग्लिश स्कुल 4 केंद्र, इटावा जिल्हा परिषेद शाळा 2 केंद्र, रांजणगाव (शे़पु) गजानन विद्या मंदिर 4 केंद्र, बसवंतराव पाटील इंग्लीश स्कुल केंद्र 4, जयभद्रा प्राथिमिक व माध्यमिक विद्यालय रांजणगाव केंद्र 3, रांजणगाव जिल्हा परिषेद शाळा 5 केंद्र, ग्रामविकास विद्यालय 4 केंद्र, रांजणगाव जिल्हा परिषेद शाळा नवीन इमारात 5 केंद्र, शहीद भगतसिंग रांजणगाव 4 केंद्र, माऊंट व्हॅली स्कुल 3 केंद्र, जोगेश्वरी जिल्हा परिषेद शाळा 7 केंद्र, जगदंब प्राथिमिक विद्यामंदिर 4 केंद्र. असे 67 केंद्र आहेत.
दोघांमध्येच चुरशीची लढत –
संभाजीनगर पश्चिम आणि गंगापूर खुलताबाद मतदार संघात प्रामुख्याने दुरंगी लढत होत. या दोन्ही मतदार संघातील ठीक ठिकाणाहून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर -खुलताबाद मतदार संघात प्रामुख्याने आमदार सतीश चव्हाण आणि आमदार प्रशांत बंब. तसेच संभाजीनगर पश्चिम मतदार संघात देखील आमदार संजय शिरसाट व बाळासाहेब ठाकरे गटाचे राजू शिंदे यांच्यात सरळ सरळ लढत होत असल्याचे दिसून येत आहे.
