March 23, 2026

 

वाळुज महानगर, (ता.23)- वाळूज ते लिंबे जळगाव दरम्यान हॉटेल नव निर्माण समोरील पडीत जमिनीतील लिंबाच्या झाडाला एका मध्यम वयीन इसमाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. मंगळवारी (ता.23) रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास आढळलेला हा मृतदेह कुजलेला आहे. हा खून आहे की, आत्महत्या. संभ्रमात वाळूज पोलीस सापडले आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी (ता.23) रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास एक अनोळखी ईसम वय अंदाजे 40 वर्ष, शिवराई शिवार, हाॅटेल नवनिर्माण समोर छत्रपती संभाजीनगर ते पुणे रोड लगत पडित जमिनीत एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळुन आला. मयत इसमाचा मृतदेह कुजलेला असून त्याचे वय अंदाजे 45 ते 50 आहे. त्याच्या अंगात पिवळसर टि शर्ट, काळी पॅन्ट व निळ्या रंगाची स्लीपर आहे. या इसमाबाबत कोणाला काहीही माहिती मिळाल्यास किंवा माहिती असल्यास वाळूज पोलीस ठाणे किंवा मोबाईल नंबर 9637440436 वर संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस अंमलदार दशरथ खोसरे यांनी केले आहे.
दोन दिवसात आढळले दोन मृतदेह –
वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (ता.22) दुपारी बजाज कंपनीच्या संरक्षण भिंती लगतव मंगळवारी (ता.23) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अंदाजे 45 ते 50 वर्षे इसमाचा आढळून आला. हे दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून दोन्हीही अनोळखी आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गाच्या लगत आढळून आलेल्या या दोन्हीही इसमाच्या मरणाचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याने या घटनेमुळे वाळूज परिसरात चर्चेला मोठे उधाण आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *