March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.20) – चांगले मित्र आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. तर वाईट संगतीमुळे चांगली मुलेसुद्धा वाईट मार्गास लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुमची आजची चांगली संगतच तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. त्यामुळे विद्यार्थीदशेत वाईट मित्रांपासून दूर राहा चांगल्या मित्रांची संगत करा. असे प्रतिपादन इप्का लॅबोरेटरीज कंपनीचे मानव संसाधन विभागप्रमुख डॉ.व्यंकट मैलापुरे यांनी केले.

वाळूज येथील इप्का लॅबोरेटरीज कंपनी व इप्का फाउंडेशन मुंबईच्या वतीने रांजणगाव पोळ येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वर्गात बैठक व्यवस्थेसाठी सीएसआर निधीतून ब्रांचेस भेट देण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.व्यंकट मैलापुरे यांनी वरील प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पोपटराव सावंत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजीराव बोडखे, इप्का कंपनीचे रमेश बिराजदार, एकनाथ पवार, प्रशासकीय अधिकारी संतोष मल्लनाथ, ज्येष्ठ शिक्षक विलास जाधव, पालक प्रतिनिधी दिगंबर कुऱ्हाडे, शरद गुंजाळ, मुस्ताक शेख, नंदकुमार बोडखे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक पोपटराव सावंत यांनी केले. सूत्रसंचालन कल्पना सोनवणे यांनी तर आभार संतोष मल्लनाथ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के.बी.मोरे, रामेश्वर शेळके, शिवाजी महाजन, सी.एच.शिरसाट, तुकाराम शेलार, प्रतिभा नितनवरे, शिवलीला कूकलारे यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिसर घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *