वाळुजमहानगर, (ता.18)- वाळूज येथील पाणी टंचाई लक्षात घेता, तसेच वाळूज ग्रामपंचायतच्या विनंती वरून गरवारे हायटेक फिल्म्स लिमिटेड यांच्या सौजन्याने वाळूज ग्रामपंचायत परिसरातील राहिवाश्यांसाठी दोन महिने दररोज 50 हजार लीटर पाणी पुरविणार असून याची सुरुवात 17 एप्रिल पासून करण्यात आली.
वाळूज येथील गरवारे कंपनी हे पाणी ग्रामपंचायत वाळूजच्या विहीरमध्ये सोडणार आहे. त्यानंतर पंचायतच्या नियमित वेळापत्रक प्रमाणे हे पाणी नागरिकांना वितरीत करण्यात येईल. असे वाळूजचे माजी सरपंच तथा जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती मनोज जैस्वाल यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले. 
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल भालेराव, गरवारे हायटेक फिल्म्स लिमिटेडचे सुनिल सुतवने, दिनेश पुंड, रमाकांत रौतल्ले, प्रविण कुलकर्णी, रामेश्वर वल्ले, रविकिरण आढाव, गणेश तुपे, जगदीश चव्हाण, मछिन्द्र दळे पाटील, तात्यासाहेब देवडे, दिलीप औताडे, अशोक पवार, आदित्य पाटील यांच्यासह वाळूज गावातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

