March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.18) – दिवसभर कंपनीत काम केल्यानंतर पगाराचे पैसे घेऊन घरी येत असलेल्या एका 50 वर्षीय कामगारास दोन जणांनी रस्त्यात अडवले. व हाताचापटाने व दगडाने मारहाण करून खिशातील 8 हजार रुपये बळजबरीने काढून घेऊन पळून गेले. ही लुटीची घटना मंगळवारी (ता.16) रोजी रात्री 8.15 वाजेच्या सुमानास रांजणगाव (शेणपुंजी) जवळ घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव (शेणपुंजी) येथील कुकुर प्रसाद रामधारी प्रसाद वय 50 वर्ष हा कामगार मंगळवारी (ता.16) रोजी रात्री 8.15 वाजेच्या सुमारास कंपनीतून पायी घरी येत होता. रांजणगाव जवळील एका चिकन शाँपजवळ त्याच्या ओळखीचा पंकज थोरात व त्याचा मित्र अजय त्याच्याकडे आले. व दारु पिण्यासाठी पैसे मागितले, त्यास नकार दिला असता, त्यांनी हाताचापटाने व दगडाने मारहाण करून खिशातील 8 हजार रुपये बळजबरीने काढून घेऊन पळून गेले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पंकज थोरात व त्याचा मित्र अजय यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *