
वाळुज महानगर, (ता.6) – बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविदयालयातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतून उत्तीर्ण झालेला अमोल उत्तमराव महावरे या विद्यार्थ्याची जिल्हा परिषद बुलडाणा येथे कनिष्ठ अभियंता या पदावर निवड झाली आहे.

या यशाबददल भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथराव जाधव, संस्थेचे सहसचिव अमन जाधव यांनी त्याचे स्वागत केले आहे. तसेच हायटेक अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा. गोविंद ढगे, हायटेक अभियांत्रिकीचे मॅकेनिकल विभागप्रमुख प्रा. अमोल अडकिणे, सिव्हील विभागप्रमुख प्रा. आर एफ. सिध्दीकी, कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख प्रा. प्रताप मोहिते, प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ. भावना पिंगळे, सीएसईएआयएमएल विभागप्रमुख प्रा. संदिप इंगळे, ट्रेनिग ॲण्ड प्लेसमेंटस विभागाचे अधिकारी प्रा. जनार्धन भोर, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अमोल महावरे याचे स्वागत केले.
