July 29, 2026

 

वाळुज महानगर, (वार्ताहर) – सातबाऱ्यावर रस्त्याची स्पष्ट नोंद असूनही रस्ता मोकळा करून न्याय न देता संबंधित कार्यालय तारीख पे तारीख देत असल्याने शेत मशागत करणे, पीक काढणी अशा विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी त्रस्त आहे.

बाबत गोविंदपुर आपेगाव येथील शेतकरी दत्तात्रय भिमराव रोकडे यांनी महसूल मंत्री, तहसील कार्यालय गंगापूर यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, त्यांची गोविंदपुर शिवारातील गट नंबर 41 मध्ये चार एकर शेती आहे. त्यांच्या शेतीच्या सातबाऱ्यावर रस्त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र हा रस्ता अडवण्यात आल्याने तो मोकळा करून द्यावा. या मागण्यासाठी दत्तात्रय रोकडे हे गेल्या अनेक महिन्यापासून शासन दरबारी चपला झिजवत आहे. मात्र अद्यापही त्यांना न्याय मिळाला नाही. परिणामी शेतात जाणे, मशागत करणे, पीक काढणे अशा विविध समस्यांचा सामना या शेतकऱ्यांना लागत लागत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून शासन दरबारी चकरा मारून फक्त तारीख पे तारीख दिल्या जात असून न्याय मिळत नसल्याचा आरोपही शेतकरी दत्तात्रय रोकडे यांनी केला आहे.

 

        महसूल मंत्र्या पर्यंत धाव –

रस्त्यासाठी त्रस्त असलेल्या दत्तात्रेय भीमराव रोकडे या शेतकऱ्याने गेल्या नऊ ते दहा महिन्यापासून शासन दरबारी चपला झिजवल्या. शिवाय थेट महसूल मंत्री, तहसीलदार गंगापूर, आसेगाव सध्याचे मंडळ अधिकारी, रांजणगाव पोळ चे महसूल अधिकारी यांच्या पर्यंत धाव घेतली. या नऊ-दहा महिन्याच्या काळात घटनास्थळाच्या पंचनामा शिवाय रोकडे यांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे आजही रोकडे हे शेत मशागत करणे, पीक काढणी अशा विविध समस्यांचा सामना करत आहे. त्यामुळे रोकडे हे शेतकरी त्रस्त झाले असून ते शासनाच्या या उदासीन धोरणापुढे हतबल झाले आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *