March 20, 2026


वाळूजमहानगर, (ता.28) – विद्यार्थ्यांनो मोठी स्वप्न बघा आणि ते साकार करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम करा, परिश्रमाशिवाय यश नाही. कारण यशाला शॉर्टकट नसतो. असे प्रतिपादन मुख्याध्यापक गौतम शिंदे यांनी रांजणगाव (पोळ) येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक विद्यालयात सोमवारी ता.27 फेब्रुवारी रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमात केले.

अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुधाकर थोरात होते. तर प्रमुख पाहुणे शालेय समिती अध्यक्ष शिवाजीराव बोडखे, प्रशासकीय अधिकारी संतोष मल्लनाथ यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गौतम शिंदे यांनी शाळा हे संस्कार घडवण्याचे ज्ञानमंदिर असून, या ज्ञानमंदिरातून संस्कारक्षम पिढी घडवण्याचे कार्य शिक्षक करत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी दिलेले ज्ञानाची शिदोरी घेऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी व आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. स्पर्धेच्या युगात आपल्याला सिद्ध करायचे असेल तर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, महाविद्यालयीन जीवनात चांगले मित्र जोडा, वाईट संगतीपासून दूर राहा. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवा. यासाठी स्वप्न मोठी बघा, प्रचंड जिद्द व अभ्यासात सातत्य ठेवा आपण जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तरन्नुम शेख, कल्याणी घोडके या विद्यार्थिनींनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुधाकर थोरात यांनी तर आभार प्रशासकीय अधिकारी संतोष मल्लनाथ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक विलास जाधव, शिवाजी महाजन, अनिल कुमावत, के बी मोरे, रामेश्वर शेळके, डी.पी.चिमणकर, ए. एच. शेख, सी.एच.शिरसाट,चंद्रकांत गायकवाड, तुकाराम शेलार, राजू सांगळे, प्रतिमा नितनवरे, आनंद बोडखे, शिवकन्या कुकलारे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *