
वाळूज महानगर (ता.24) :- घरासमोरील तारेवर आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या एका आकडेबहादराने पत्रकारास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना वाळुज येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर येथे मंगळवारी (ता.21) रोजी सायंकाळी घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दैनिक मराठवाडा केसरीचे पत्रकार अशोक श्रीखंडे हे साठेनगर, वाळूज येथे राहतात. मंगळवारी (ता.21) रोजी होम उर्फ महेश अनिल राजगुरू यांनी विद्युत पोल वरून आकडे टाकल्यामुळे सबंधित वायरला कार्बन आल्यामुळे त्यांची लाईट बंद होती. त्यामुळे वायरमन यांना लाईट बंदची माहिती मोबाईल वरून दिली. वायरमन येणार असल्यामुळे होम उर्फ महेश अनिल राजगुरू याने घरासमोर येऊन पत्रकारांच्या भावा समोर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पत्रकार अशोक श्रीखंडे यांच्या तक्रारीवरून वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी होम उर्फ महेश अनिल राजगुरू याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुखदेव भागडे करीत आहे.
