
वाळूजमहानगर, (ता.19) :- मदर तेरेसा इंग्लिश स्कूल व महाराष्ट्र मराठी शाळा वाळूज येथे “छत्रपती शिवाजी महाराज” यांची जयंती” रविवारी (ता.19) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रथम राज्यशासनाच्या आदेशानुसार राज्यागिताचे गायन करून घेण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अफसर पटेल व प्रमुख पाहुणे म्हणून तोफीक पटेल यांची उपस्थिती होती. याप्रसंगी अध्यक्षांनी “छत्रपती शिवाजी महाराज” यांची जयंती” दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रवींद्र उकिर्डे, इरफान शेख, अय्युब सय्यद, रफिक शेख, कनिस शेख, सिमा शेख, वैशाली गाडेकर, मोहिनी देशमुख, दिनेश पालोदकर, गणेश बनकर, बाळू पालवे, योगेश मोर्ये, रघुनाथ अंभोरे, स्वप्निल काकळे, संतोष खरात, ताजोद्दीन शेख यांची उपस्थित होती.
