March 23, 2026


वाळूज महानगर (ता.14) :- दुकान बंद करून कार्यक्रमासाठी भावाकडे गेलेल्या महिलेच्या दुकानातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने व पैठणी किमती साड्या असा जवळजवळ 18 ते 20 लाख रुपयाचा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून डीव्हीआर सुद्धा लंपास केला. ही चोरीची घटना मंगळवारी (ता.14) रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अरविंद भगवंता यादव रा. सई संकेत पार्क गट 106, रो हाऊस नं 33, बीड बायपास औरंगाबाद यांचे साजापूर गट नंबर 41 मधील प्लॉट क्रमांक 52 येथे श्री महालक्ष्मी कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. यादव यांच्या मुलीचे 30 मे रोजी लग्न आहे. त्यापूर्वी 27 फेब्रुवारी रोजी साखरपुडा असल्याने लग्नाचा बस्ता खरेदी करून त्यांनी दुकानात ठेवला होता. विशेष म्हणजे लग्नाच्या बस्त्यासाठी त्यांनी रक्कमही जमा केली होती. मात्र बस्ता बांधताना वराकडील मंडळींनी पैसे भरले. त्यामुळे त्यांच्याकडील पैसे तसेच होते. अरविंद यादव यांच्या पत्नी संगीता यांच्या भावाच्या घरी कार्यक्रम असल्याने रोख रक्कम व लग्नाचा बस्ता दुकानात ठेवून संगीता व अरविंद यादव सोमवारी (ता.13) रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास कार्यक्रमासाठी सिडको वाळूज महानगर येथे गेल्या होत्या. त्यानंतर रात्री उशिरा झाल्यामुळे तशाच बीड बायपास येथील राहत्या घरी गेल्या. सकाळी ते दुकानात आले असता ही चोरी झाल्याचे लक्षात आले. या चोरी बाबत त्यांनी सांगितले ते असे……

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *