March 23, 2026


वाळूजमहानगर (ता. 10) :- युवा नेते संतोष भाऊ माने यांच्या विशेष प्रयत्नाने सावखेडा, ता. गंगापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत 20 लक्ष रुपयांचा निधी सिमेंट काँक्रिट रस्तेच्या कामासाठी मंजूर करण्यात आला होता. कामाचे भूमी पूजन युवा नेते संतोष भाऊ माने यांच्या हस्ते करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिन विधाटे, सरपंच अशोक निकम, उपसरपंच भास्कर केदारे, अय्युब भाई शेख, उध्दव विधाटे, भिमराज ठोकळ, विष्णू मुळे, राजू जैस्वाल, अर्जुन मुळे, विठ्ठल बोरुडे, कल्याण बोरुडे, अमोल केदारे, संदीप केदारे, काकासाहेब ठोकळ, मुक्तर शेख, ताराचंद आहिरे, मच्छिंद्र मोरे, साईनाथ ठोकळ, गिरीश महाजन, अशोक वल्ले, गोपीनाथ झरेकर व इतर ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *