February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.29) – रांजणगाव (पोळ) ता.गंगापूर येथील नॅशनल इंग्लिश स्कूल, विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज येथे बजाजनगर येथील लघाने मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ.अक्षय लघाने यांच्या हस्ते प्रतिमापूजन, ध्वजपूजन होऊन ध्वजारोहणाने 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी मुख्याध्यापक प्रदिप कऱ्हाळे, प्रविण कुऱ्हाडे तसेच संस्थेचे कारभारी पवार, पालक प्रतिनिधी अशोक धनुरे आणि पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रथम सकाळी प्रभातफेरी झाल्यानंतर ध्वजारोहण, राष्ट्रगीत, ध्वजगीतानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कवायत डंबेल्स, घुंगरू काठी, संगीत लेझीम, मानवी मनोरा याचे प्रात्यक्षिक दाखविले आणि सर्वांना मंत्रमुग्ध केले. छोट्या मुलांचे देशभक्तीपर थीमवरत डान्स झाले. तसेच शिक्षक प्रतिनिधी प्रदिप पठारे यांनी संविधानाचे महत्व सांगितले. तसेच प्रमुख पाहुणे डॉ.अक्षय लघाने यांनी बाबासाहेबांना अभिवादन करून प्रेरणादायी कविता सादर केली व प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते शासनाच्या तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी व सहभागी संघाचे व खेळाडूंचे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

17 वर्ष वयोगटाखालील मुलींमध्ये 3000 मीटर धावणे यामध्ये कु.सपना अशोक धनुरे हिने विभागीय पर्यंत मजल मारली. यानिमित्ताने तिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली वाघचौरे यांनी केले. तसेच सुंदर फलकलेखन नितेश पठारे सर यांनी केले. तर सचिन दारूंटे आणि किशोर पवार यांनी फोटोग्राफीचे काम पाहिले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रदिप कऱ्हाळे, प्रविण कुऱ्हाडे तसेच जेष्ठ शिक्षक सचिन जाधव, प्रितेश कुकलारे, शीतल आढाव, सुवर्णा बोडखे, रूपाली देवकर, सुरेखा पवार, दिपाली सोनवणे, प्रतिक्षा गोतांडे, जाफर शेख, शोभा शहाणे, यमुनाबाई राऊत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *