February 5, 2026
Screenshot_2023-01-28-13-36-21-07_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

वाळूजमहानगर, (ता.28) – वाळूज औद्योगिक वसाहतमधील एका कंपनी कामगाराने त्याच्या 9 वर्षीय जुळ्या मुलांना दुचाकीवर नेत जालना जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला मुलांना विष पाजून स्वतः विष प्राशन केलं. यात वडिलाचा मृत्यू झाला असून दोन्ही चिमुकल्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही अत्यंत खळबळ जनक घटना शनिवारी (ता.28) रोजी घडली. मात्र त्याने मुलांना विष पाजून आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय का घेतला. याचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे.

या प्रकरणी नातेवाईक आणि पोलिसाकडूनच मिळालेली माहिती अशी की, भागवत पंजाजी काळे वय 34 रांजणगाव (शेणपुंजी), वाळूज औद्योगिक वसाहत. (मूळ रा. जालना जिल्हा) हा सुमारे दहा वर्षापासून वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) भागात रोजगार निमित्ताने राहत होता. तो भक्ती काळे व वेद काळे वय 9 वर्षे या दोन्ही जुळ्या मुलांना घेऊन फिरून येतो. असे सांगून काळे हा घराबाहेर गेला होता. त्यानंतर काळे याने जालना – अंबड रस्त्यावर दोन्ही मुलांना विष पाजुन स्वतः विष प्राशन केल्याची माहिती त्यांच्या मावस भावाला फोन करून दिली. त्याने तातडीने घटनस्थळी धाव घेत काळे व दोन्ही मुलांना जालना येथे रुग्णालयात हलविले. तेथे प्राथमिक उपचार करून तिघांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना काळे यांचं मृत्यू झाला. तर दोन्ही मुलांवर उपचार सुरू आहे. या प्रकरणी औरंगाबाद पोलीस आयुक्तालय हद्दीतील सिडको पोलीस ठाण्यात झिरोने अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. काळे यांनी स्वतच्या मुलांना विष पाजुन स्वतः आत्महत्या का केली. हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *