March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.27) – श्रीराम कथा ऐकल्यानंतर घरी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र व सोन्याची चैन हिस्काऊन पळ काढणाऱ्या एका महिला चोरास दक्ष महिलांनीच पकडून बुधवारी (ता.25) रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामुळे श्रीराम कथा ऐकणाऱ्या त्या महिलेचा 23 हजार रुपये किमतीचा ऐवज बचावला.

शिवसेनेच्या वतीने बजाजनगर येथे श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले होते. ही कथा ऐकण्यासाठी परिसरातील महिलांची मोठी गर्दी होत होती. त्यामुळे या परिसरात चोरट्यांचाही वावर वाढला होता. बुधवारी (ता.25) रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास बजाजनगरात श्रीरामकथा ऐकण्यानंतर संध्या किरण कदम रा. बजाजनगर. ही महिला घरी जात होती. गर्दीचा फायदा घेत एका चोर महिलेने कमल यांच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र व सोन्याची चैन हिसकावली. व पळून जाऊ लागली. त्यामुळे तिने आरडा ओरड केली असता काही दक्ष महिलांनी त्या महिला चोरास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या संशयित महिलेची चौकशी केली असता तिने तीचे नाव कमल सुरेश जाधव (45) रा. वाल्मिकनगर, बीड, (ह.मु.नांदूर, ता.गेवराई) असे असल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी संशयित कमल जाधव या महिलेची अंगझडती घेतली असता तिच्याकडे संध्या कदम यांच्या गळ्यातील 15 हजाराचे मंगळसूत्र व 8 हजाराची सोन्याची चैन मिळून आली. या प्रकरणी संध्या कदम यांच्या तक्रारीवरुन मंगळसूत्र चोर महिला कमल जाधव हिच्याविरुध्द वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.राजेंद्र उदे हे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *