February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.27) – प्रजासत्ताक दिना निमित्ताने 26 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता पिरबावडा येथे ऐतिहासिक भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. सामर्थ्य प्रतिष्ठान, प्रहार विद्यार्थी संघटना, तिरंगा फाऊंडेशनच्या या अनोख्या उपक्रमात पंचक्रोशीतील विद्यार्थी, नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते. या पदयात्रे मध्ये अखंड 211 फुटाचा तिरंगा ध्वज विद्यार्थ्यांनी डोक्यावर घेऊन गावामधून रॅली काढली.

 

या तिरंगा पदयात्रेचे आयोजन सामर्थ्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा प्रहार विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा गाडेकर यांनी केले होते. या रॅली साठी तिरंगा फाऊंडेशन फुलंब्री, न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय पिरबावडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, ज्ञानराज बहुद्देशीय संस्था आदींच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आली.
जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणातून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी देशभक्तीपर गीताने गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या तिरंगा पदयात्रेच्या निमीत्ताने वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या निरीक्षक आरती जाधव व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. यासोबतच पिरबावडा ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच डॉ. सारंग गाडेकर व ग्रापंचायत सदस्य, ग्रामसेवक, सोसायटी सदस्य, तिरंगा फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजित घोडके, ज्ञानराज संस्थेचे अध्यक्ष राज गाडेकर, न्यू हायस्कूल पिरबावडाचे मुख्याध्यापक सोनवणे सर, जिल्हा परिषद पिरबावडाचे मुख्याध्यापक बनकर सर आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
———–

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *