
वाळूजमहानगर, (ता.25) – दामिनी पथकातील वाळूज महानगरच्या पोलिस निरीक्षक अनिता फसाटे यांनी वाळूज परिसरातील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी व महाविद्यालय, बजाजनगर येथेबुधवारी (ता.25) रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी खास संवाद साधला. या संवाद कार्यक्रमात त्यांनी व त्यांच्या टीमने उपस्थित सर्व विद्यार्थिनींना महिला सुरक्षेविषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी फसाटे यांनी महिलांची सुरक्षा, त्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणा, सुविधा आणि प्रशासन यांची माहिती दिली. तर पोलिस नाईक निर्मला निंभोरे व मनिषा बनसोडे यांनी भविष्यात कोणत्याही मुलींना महिला विषयक अडचणींना सामोरे जावे लागले तर सर्व अधिकार माहित असावेत. याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, सहसचिव अमन जाधव, प्राचार्य संतोष शेळके, प्रशासकीय अधिकारी बी.बी. जाधव व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
