February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.24) – सिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील रांजणगाव (पोळ) येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक विद्यालयाच्या मागील बाजुच्या खिडक्यांचे गज तोडुन चोरट्यांनी लाखो रूपयांचे संगणक व शालेय उपयोगी साहीत्य लंपास केले. ही घटना रविवारी (ता.22) रोजी सायंकाळी उघडकीस आली.

नेहमी प्रमाणे शनिवारी शाळा बंद करून शिक्षक आणि शाळेतील कर्मचारी घरी गेले. रविवारी (ता.22) रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान परिसरातील काही विद्यार्थी शाळेच्या आवारात व्यायाम करण्यासाठी आले असता त्यांना एका वर्गाची कुलुप तुटलेली दिसली. त्याक्षणी विद्यार्थ्यांनी शाळेतील सहशिक्षक रामेश्वर शेळके यांना फोन करून माहीती दिली. तेव्हा शेळके व त्यांचे सहकारी शिक्षक विलास जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर थोरात यांना दिली. घटनेची पाहणी केली असता, यात कम्प्युटर मॉनिटर 4 नग, एलईडी टिव्ही 1 नग, कीबोर्ड 1, दोन स्पिकर, माऊस, सीपीयु, प्रिंटर प्रतेकी एक एक नग असे साहीत्य गायब आसल्याचे निदर्शनास आले.

या घटनेची माहिती मिळताच सिल्लेगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. तसेच स्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मुख्याध्यापक सुधाकर थोरात यांनी या घटनेची माहिती शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजीराव बोडखे यांना दिली. त्यानंतर शिवाजी बोडखे यांनी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना फोन द्वारे शाळेत घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावेळी प्रशासकीय अधिकारी संतोष मल्लनाथ, विलास जाधव, शिवाजी महाजन, अनिल कुमावत यांच्या सर्व शिक्षक व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी घटनास्थळाची पाहणी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *