February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.24) – छत्रपती शाहू महाराज शाळा येथे 9 व्या शिक्षण घेणारी 14 वर्षीय विद्यार्थीनी शाळेत गेली असता ती घरी परतलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेऊनही मिळून आली नाही. या प्रकरणी तिचे कोणीतरी अपहरण केल्याच्या संशयावरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.21) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मनीषा गोरखनाथ राठोड वय 14 रा. जोगेश्वरी असे अपहरण झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे वडील वाळूज औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. जोगेश्वरी येथील छत्रपती शाहू महाराज शाळा येथे मनीषा ही नववीच्या वर्गात शिक्षण घेते. नेहमीप्रमाणे मनीषा राठोड ही 19 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता शिक्षणासाठी गेली होती. शाळा सुटल्यानंतरही ती घरी न आल्याने तिचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. अखेर मनीषा राठोड हीचे वडील गोरखनाथ यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर जायभाय करीत आहे. राखाडी रंगाचा टॉप व निळ्या रंगाची पॅन्ट असाच तिच्या अंगात शाळेचा ड्रेस आहे मराठी व बंजारा भाषा बोलते याबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क साधा. असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *