February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.23) – फ्रॉस्ट अँड सुलीवन तर्फे 2022 वर्षासाठी आयोजित केल्या गेलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये मेटलमन ऑटो प्रा. लिमिटेड कंपनीने मिडीयम बिसनेस इंडिया मॅन्युफॅक्टरिंग एक्सलन्स मध्ये “गोल्ड अवॉर्ड” मिळवला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा बंगळूर येथील हॉटेल ताज मध्ये 20 जानेवारी 2023 ला आयोजित करण्यात आला होता.

फ्रॉस्ट अँड सुलीवन ही एक जागतिक संघटना असून दरवर्षी सखोल ऑडिट केल्यावरच हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार ऑटोमोटिव्ह जगतातील एक अव्वल दर्जाची उत्पादक कंपनी होण्याचे मेटॅलमनचे व्हिजन आणि कर्मचार्‍यांच्या नाविन्यपूर्ण आणि आउट ऑफ दि बॉक्स विचारांची साक्ष आहे. असे प्रतिपादन मेटॅलमन ऑटोचे सी.ओ.ओ. श्रीकांत मुंदडा यांनी पुरस्कार स्वीकारताना केले. या पुरस्कारासाठी अनिलकुमार डहाळे, आशिष शर्मा, प्लांट हेड, बी-12 -पी. एम. एखंडे, एस व्ही. शानभाग, एच आर हेड – विजय साळवे, राम राठोड, प्रवीण जोशी, बडगुजर, अथिया युसूफ, योगेश पवार, आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अथक परिश्रम आणि योगदान तसेच मेटॅलमनचे सर्व संचालक मंडळ आणि COO यांचे सदैव मार्गदर्शन आणि योग्य दिशानिर्देश लाभले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *