
वाळूजमहानगर, (ता.8) – बजाजनगर येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी वाटचाल कायम ठेवत शैक्षणिक सत्र 2022 – 2023 मध्ये झालेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत 8 विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवत नेत्रदीपक यश संपादन करून प्रात्यक्षिक परीक्षेस पात्र ठरले आहे.
या परीक्षेत धनश्री बाबुराव कदम हिने औरंगाबाद विभागातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेस पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षेत इयत्ता 5 वी मधून 39 व इयत्ता 9 वी मधून 19 असे एकूण 50 विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवत पात्र ठरले आहे. इयत्ता 9 वी मधून अलिशा शैलेश गजभिये, श्रेयस नारायण वसमतकर, धनश्री बाबुराव कदम व सोहम दिगंबर रावले यांनी औरंगाबाद ग्रामीण विभागातून शिष्यवृतीस पात्र ठरले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदानी तसेच पालक यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या.
