
वाळूजमहानगर, (ता.6) – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पद्माकर बंडु पगार यांना इतिहास विषयामध्ये पीएचडी ही मानाची पदवी बहाल केली आहे. त्यांनी “समतेच्या शिकवणुकीतील वारकरी संप्रदायाचे योगदान : एक ऐतिहासिक अभ्यास (कालखंड 12 वे ते 17 वे शतक) ‘या विषयावर आपला ‘शोधप्रबंध’ विद्यापीठास सादर केला आहे. या कामी डाॅ.पगार यांना प्रा.डाॅ. एस. एन. वाघ (दानकुवर महिला महाविद्यालय, जालना) यांचे मार्गदर्शन लाभले. 
पगार यांनी अनेक अडचणीवर मात करत ही मानाची पदवी मिळवली. त्याबद्दल डाॅ.पद्माकर बंडू पगार यांचे इतिहास विभागाच्या प्रमुख डाॅ.पुष्पा गायकवाड, प्रा. डाॅ.उमेश बगाडे, डाॅ.बीना सेंगर, डॉ. गितांजली वोराडे, मोड़ी तत्ज्ञ मच्छिंद्र चौधरी यांनी स्वागत केले आहेे.
तसेच भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे अध्यक्ष जे.के.जाधव, प्राचार्या व्हि.के. जाधव व सहकारी तसेच शिवराम म्हस्के, डाॅ.मोसिन शेख, डाॅ.मधुकर हिवाळे, शरद गुंडसर, अनिता ज्ञानदेव थोरात, मनोज घोडके, बाळु पाटील शेळके, ज्ञानेश्वर पगार, डाॅ.शिवप्रसाद घोडके, कल्याण माळवेे, कैलाम शेलार, अशोक शेळके, संदिप शेळके, शाम पवार यांच्यासह बजाजनगर व पालखेड ग्रामस्थ आदींनी त्यांनी अभिनंदन केले आहे.
