February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.3) – दारू पिऊन लग्नात नाचण्याचे प्रकार वाढत आहे, नको त्या गोष्टीवर लग्नात खर्च होतो. त्यापेक्षा गरीब विद्यार्थ्यांची फीस भरा, त्यांना वह्या पुस्तके द्या. व्यसनाच्या अधीन न जाता आपली संस्कृती कशी

 

टिकेल यासाठी प्रयत्न करा. एकमेकांना मदत करा. सप्ताह कोणताही असो शेवटची पंगत ही खैरे साहेबांची असते. साप्ताहात केलेलं अन्नदान वाया जात नाही. त्यामुळे दान धर्म करा. असे आवाहनपर उपदेश हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी दिला.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील बजाजनगर येथे करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.

याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, ऍड. आशुतोष डंख, नगरसेवक सचिन खैरे, उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, शहर संघटक आशा दातार, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, बबन दिंडोरे, गायके महाराज, उद्योजक कैलास भोकरे, अमोल पोटे, प्रतीक बाफना, मीरा पाटील, छाया जाधव, विशाल खंडागळे, दत्तात्रय वर्पे, महेंद्र खोतकर, बबनराव चौरे आदींसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *