February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.02) – वाळुज येथील ग्रेस फॉर ऑल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वाळूज परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात चर्चच्या सभासदासह ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील अनेक प्रतिष्ठिताने भाग घेत हे स्वच्छता अभियान राबवून परिसर झाडून स्वच्छ केला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2023 रोजी हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे स्वच्छ भारत. या संकल्पनेतून इमानुएल प्रार्थना भवन वाळुज या चर्च चे इन्चार्ज रेव्ह.रवी एम साळवे यांनी हा उपक्रम राबवला. यामध्ये चर्चमधील सर्व महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला. वाळूज पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद शाळा व झेंडा मैदान या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यासाठी ग्रामपंचायत वाळुज सफाई कामगार यांनी देखील सहकार्य केले.

राजू पारखे, राजन इंगळे, लखन कांबळे, राजेंद्र आडगळे, सचिन शिरसागर, तुषार साळवे, मारुती इबितवार, सुधाकर दळवी, रावसाहेब मिसाळ, कृष्णा कांबळे, रणजीत कोळगे, अक्षय साबळे, अर्पण साळवे, शितल साळवे, साधना कोळगे, कल्पना गायकवाड, मंदा खंडागळे, मंदाकिनी साळवे, तेरेजा पारखे, ताराबाई आढागळे, रूपाली, कांबळे, सुरेखा इंगळे, रिबेका नाडे, कोमल नाडे, छाया नाडे, नंदा पाखरे, सुरेखा साबळे, मनीषा शेळके, प्रतीक्षा सोनवणे, सुरेखा भालेराव यांच्यासह चर्चचे सर्व सभासद उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *