
वाळूजमहानगर, (ता.30) – भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी (ता.30) रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बजाज कंपनीच्या मटेरियल गेट समोर झाला. जखमीस उपचारार्थ घाटीत दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तेजस पुष्प उत्तम टेकाळे हा दुचाकी (एम एच 06-एक्स 340) वरून जात असताना दुचाकी व अज्ञात वाहनाची धडक झाली. यात दुचाकीवरील टेकाळे हा गंभीर जखमी झाला.
शुक्रवारी (ता.30) रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान बजाज कंपनीच्या मटेरियल गेटवर हा अपघात झाला. याच वेळी सीआरपीएफच्या पोलीस जवानांची व्हॅन वाळुज महामार्गावरून जात होती. त्यांनी अपघात पाहताच व्हॅन थांबवून जखमींना युवा सेनेचे उप तालुका अधिकारी रमेश आरगडे यांच्या रुग्णवाहिकाला कॉन्टॅक्ट केल्याने जखमी व्यक्तीस विकी वाहुळ यांनी शासकीय हॉस्पिटल घाटी औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले. तसेच जखमी व्यक्तीचा मोबाईल नंबरची माहिती मिळवत जखमीच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करून अपघाताची माहिती देण्यात आली.
