February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.27) – होळकर काळातील गड-कोट किल्ल्यांचे संवर्धन व्हायला हवे. यासाठी सर्व जाती धर्मातील समाज बांधवानी एकत्र येवून याचा पाठपुरावा करावा. आपण सर्वांनी या कार्यासाठी एकत्र यावे. आहिल्यादेवी होळकरांचे कार्य त्यांची कारकीर्द याचा इतिहास जगासमोर अद्यापपर्यंत आलेला नाही. त्याचा प्रचार, प्रसार पाहीजे तेवढ्या प्रमाणात झालेला नाही. हे जगासमोर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. तसेच सर्वांनी या कार्यक्रमासाठी वाफगाव येथे येवुन प्रेरणा घ्यावी. असे आवाहन श्रीमंत भुषणसिंह राजे होळकर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घराण्याचे तेरावे वंशज श्रीमंत भुषणसिंह राजे होळकर हे महाराजा यशवंतराव होळकर राज्यभिषेक दिना निमित्त हे नुकतेच बकवालनगर (वाळूज) येथे आले होते. युवासेना तालुका उपाध्यक्ष रमेश आरगडे व उद्योजक संतोष थोरात यांनी कार्यकमाचे आयोजन केले होते.

यावेळी ते मार्गदर्शनपर बोलत होते. महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन 6 जानेवारी 2023 रोजी वाफगांव ता.खेड जि.पूणे येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावे. असे आवाहन करण्यासाठी त्यांचा हा निमंत्रण दौरा होता.

यावेळी प्रमुख पाहूने विविध कार्यकारी सोसायटी वाळूजचे माजी चेअरमन सर्जेराव भोंड यांनी आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे कार्य समजुन घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांवर जातो, त्याच प्रमाणे अहिल्यादेवीचे कार्य समजून घेण्यासाठी प्रत्येक समाज बांधवाने एकदा तरी मध्य प्रदेश येथे इंदोर आणि अहिल्यादेवीच्या राज्याची राजधानी खरगोन जिल्ह्यातील महेश्वर येथे जावून यावे. म्हणजे खरा इतिहास आपल्याला समजेल असे. मनोगत सर्जेराव भोंड यांनी मांडले.

कार्यक्रमास उपसरपंच योगेश आरगडे, युवा सेना उपतालुका प्रमुख रमेश आरगडे, समाजाचे नेते रामनाथ मंडलिक, ता.महीला संघटक लताताई इले, राष्ट्रवादी तालूका अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ, होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य सदस्य सचिन काकडे, संजय फटागडे, रामेश्वर लव्हाळे, राठोड मामा, सुनिल काळे, काशिनाथ आरगडे, संतोष आरगडे, तुळशिराम दाणे, डोंगरे काका, अनिता वाघचौरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर यांनी केले. सुत्रसंचलन संतोष थोरात तर युवासेना तालुका उपाध्यक्ष रमेश आरगडे यांनी आभार मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *