February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.19) – महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास परिषद, मौलाना आझाद रिसर्च अँड टे्निंग इन्स्टिट्यूट मार्टी औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अल्पसंख्याक हक्क दिवस निमित्ताने दिव्यांगाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, शाळा, शिक्षक, समाज सेवक यांच्या कामाची दखल घेत म.रा.दिव्यांग विकास परिषदेच्या वतीने अतित्कृष्ट कार्यकरणाऱ्या 20 व्यक्तिंना प्रमाणपञ, ट्रॉफी व रोपटे देऊन दिव्यांग भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. औरंगाबादचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण डाॅ.कलीमोद्दीन, इंजिनिअर वाजेद कादरी, साजीद पटेल, जेष्ठ पत्रकार अण्णासाहेब वैद्य, वाळूज औद्योगिक वसाहतीतील इप्का कंपनीचे मानव संसाधन अधिकारी डाॅ.व्यंकटे मैलापुरे, महा.राज्य. दिव्यांग विकास परिषदचे राज्य कार्याध्यक्ष समशेर पठाण, इंजिनिअर सरताज खान हे होते. तर निमंत्रित पाहुणे म्हणून भाजपा अल्प संख्यांक जि.अध्यक्ष नबी पटेल, मार्टीचे अध्यक्ष अजहर पठाण, डाॅ.तैय्यब पटेल, अँँड.नवाब पटेल, रमजानी खान, डाॅ.शोएब पटेल, डाॅ.सुलतान सौदागर, साजिद मैलाना, मनोज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग क्षेत्रात अतित्कृष्ट कार्य करणारे पारसचंद साकला, मुद्दसिर अन्सारी, शेरु पटेल, उमेदउल्ला खान, मोहम्मद वहाजोद्दीन, हाफिज फैज अहमद, शिवाजी विश्वनाथ गाडे, शिवाजीराव प्रतापसिंह राठोड सर, गोविंदअप्पा शामराव डांगे, चंद्रकला बाबुराव जाधव, शकुर हस्नोद्दीन शेख, कौशल्याबाई असरवाल, शेख शमिम चाँद, पवनकुमार कट्यारमल, अनंत नीळकंठ पाटील, शाहुराज तुकाराम चित्ते, निजाम इसा पठाण, सय्यद रुबिना सुलताना, प्रशांंत भाऊराव चाबुकस्वार, अन्सार बन्नुशा शेख आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक समशेर पठाण यांनी केले तर सुञसंचालन शेख मुख्तार व सतीश वानखडे यांनी केले. तर अभार रमजान खान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल पटेल, हाजी इब्राहिम, जफर पठाण, अवेज पटेल, जावेद पठाण, सकलैन पटेल, आरेफ पठाण, शेख मुस्तकिम, सुलतान पटेल, शेख अंजुम, शेख सना यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *