February 5, 2026


वाळूजमहानगर (ता.26) :- “दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी” या उक्तीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा केल्या जाते. त्याचाच एक भाग म्हणून तिसगाव येथील सलामपुरे कुटुंबीयांनी गाई म्हशीची ओवाळणी करून बुधवारी (ता.26) रोजी गोवर्धन पूजा केली.

सोमवारी (ता.24) रोजी लक्ष्मी पूजन म्हणजेच दीपावली सर्वत्र साजरी करण्यात आली. दुसरा दिवस हा गोवर्धन पूजेचा असतो. परंतु दुसऱ्या दिवशी मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण असल्यामुळे गोवर्धन पुजा बुधवारी (ता.26) रोजी करण्यात आली.

या दिवशी म्हशीच्या व गाईच्या शेणाने गोवर्धन गिरधारी महाराज म्हणजेच श्रीकृष्ण भगवान या देवताची प्रतिकृती करून पूजा करतात. गोवर्धन पुजा ही हिंदू धर्मामध्ये चाललेली एक परंपरा आहे. ती आजही कायम ठेवण्यासाठी वाळूज परिसरातील तिसगाव येथील सलामपुरे कुटुंबीय प्रयत्नशील आहेत.

याबाबत सलाम पुरे कुटुंबातील डॉ.प्रा.भरतसींग सलामपुरे म्हणाले की, आम्ही सलामपुरे कुटुंबीय गोवर्धन पूजेचा वारसा जपत आहोत. दिवाळी सणाला जेवढे महत्त्व असते, तेवढेच महत्त्व आम्ही गोवर्धन पूजेला देतो. आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो.

यावेळी चंद्राबाई सलामपुरे, मोहनसिंग सलामपुरे, रामसिंग सलामपुरे, बरसिंग सलामपुरे, अमृत्सिंग सलामपुरे, सोनल सलामपुरे यांच्यासह सर्व सलामपुरे कुटुंबीयांनी या वेळी
गायी व म्हशीची पूजा करून ओवाळणी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *