वाळूजमहानगर – वाळूज परिसरातील ग्रामपंचायत कार्यालय वळदगाव येथे गावातील दिव्यांग लाभधारकांना दिवाळी हण आनंदात व ऊत्साहात साजरी करता यावी. यासाठी एकूण 32 जणांना प्रत्येकी 5 हजार रुपयाप्रमाणे एक लाख साठ हजार रुपयाचे धनादेश वाटप मंगळवारी (ता.18) रोजी करण्यात आले.
वाळुज औद्योगिक परिसरातील वळदगाव येथे एकुण 32 दिव्यांग व्यक्ती असून या सर्वांना ग्रामपंचायतच्या एकूण उत्पन्नापैकी पाच टक्के उत्पन्न निधी स्वरूपात प्रत्येक वर्षी वाटप करण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (ता.18) रोजी 1 लाख 60 हजार रुपये विभागुन 32 जणांना वाटप करण्यात आला. याप्रसंगी सरपंच अमर कचरुसिंग डांगर, उपसरपंच संजय त्रिंबकराव झळके, ग्रामविकास अधिकारी बळीराम धर्मु राठोड, माजी पंचायत समिती सदस्य तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश कडूबा नवले, ग्रामपंचायत सदस्य विष्णू रंगनाथ झळके, अशोक रमेश खोतकर, सीमा रितेश पहाडीये, वैशाली विनोद खोतकर, गंगा अविनाश घुले, प्रीती मनेश शिंदे, नंदा सुभाष साबळे, वर्षा महेश घोडके तसेच रितेश पहाडिये, राजेंद्र मुसळे, नितेश चुंगडे, शेख चांद पाशा, शेख शफी चांद, जालिंदर खोतकर, राधा मरमट व गावकरी उपस्थित होते.
