
वाळूज महानगर, (ता.30) – अज्ञात आरोपीने घरात घुसून दोन सिलेंडर व रोख रक्कम मिळून 33 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. जोगेश्वरी येथे झालेली ही चोरीची घटना शुक्रवारी 30 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आंबेडकरनगर जोगेश्वरी येथील साहेबराव रामचंद्र गायकवाड यांच्या घरात घुसून शुक्रवारी 30 जानेवारी रोजी भल्या पहाटे साडेबारा ते पाच वाजेच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात आरोपीने 4 हजार रुपये किमंतीची एक एच.पी कंपनीची गॅस सिलेंडरची टाकी, 25 हजार रुपये रोख व 4 हजार रुपये किमंतीची गजानन उत्तम डवारे यांची एक इंडियन कंपनीची गॅस सिलेंडरची टाकी असा एकुण-33 हजार रुपये किमंतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
