
वाळुज महानगर, (ता.12) – बजाजनगर येथील भूमिपुत्र सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती सोमवारी 12 जानेवारी रोजी सकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

येथील भूमिपुत्र सामाजिक संस्थेच्या भूखंडावर घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रथम राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मा जिजाऊची आरती करण्यात आली. यावेळी भूमिपुत्र सामाजिक संस्थेचे अजून आदमाने पाटील, पोपटराव अधिक पाटील, भाऊसाहेब डमाळे, रमेश शेळके, काकासाहेब चेळेकर, आसाराम करपे पाटील, कैलास कदम, साहेबराव पाथ्रीकर, संजय महिंद्रा, रामदास पैठणपगारे, विजय जाधव, संजय पेरे, विनायक नारखेडे व इतर पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.
