March 25, 2026

वाळूजमहानगर, (ता.7) – घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात आरोपीनी दरवाजाचा कडीकोंडा तोडून कपाटात ठेवलेले 1 लाख 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना सिडको वाळूजमहानगर -1 येथील रविकिरण बिल्डीग मध्ये बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी भर दिवसा दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अतुल विजय सकपाळ हे सिडको वाळूजमहानगर -1 येथील रविकिरण बिल्डीगमध्ये पत्नी व दोन मुलीसह राहतात. बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी अतुल सपकाळ हे कंपनीत कामाला गेले होते. तर त्यांची पत्नी विजया सपकाळ या घराला कुलूप लावून मुुलींना अंगणवाडीत सोडविण्यसाठी गेल्या होत्या. दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्या घरी आल्या असता घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. या चोरीत अज्ञात आरोपींनी घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून आतील सामान कपड्याची नासधुस्त करत कपाटाचे लॉकर मधील 75 हजाराचे अडीच तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र, 30 हजाराचे एक तोळ्याचे सोन्याचे चैन, 15 हजार रुपये किमतीचे अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी व 15 हजार रुपये किमतीचे अर्धा तोळ्याचे सोन्याचे कॉईन असा 1 लाख 35 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *