February 5, 2026

 

वाळुज महानगर, (ता.17) – पाईप लीक झाल्याने वेल्डिंग करताना फर्निस ओईलच्या टँकरचा भीषण स्फोट होऊन खानावळ चालवणारा एक जण ठार, तर जवळच्याच दुकानात काम करणारा एक जण जखमी झाला. शुक्रवारी 17 सप्टेंबर रोजी दुपारी झालेल्या या दुर्घटनेमुळे वाळूज औद्योगिक वसाहत हादरून गेली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, फर्नेस ऑईलची वाहतूक करणारा रिकामा टँकर (एम एच 20, जीसी- 2015) चा पाईप लिकेज असल्याने टँकर चालक खंडू गवळी वाळूज औद्योगिक वसाहतीतील एमआयडीसीच्या पार्किंगजवळ असलेल्या वेल्डिंग दुकानावर गेला. तेथे वेल्डिंग करताना टँकरचा भीषण स्फोट झाला. शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:45 वाजेच्या सुमारास झालेला हा स्फोट इतका भीषण होता की, टँकरच्या पत्राचे तुकडे तुकडे होऊन दूरवर उडून पडले. या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील व्यावसायिक उद्योजक आणि कामगार यांच्या कानठळ्या बसल्या. त्यामुळे ते भयभीत जाते. या स्फोटात उडालेल्या पत्र्याच्या तुकड्याची गती बंदुकीच्या गोळी सारखी होती. त्यातील एक पत्र्याचा तुकडा शेजारीच खानावळ चालवणाऱ्या रफिक गोधन शेख (वय 48) रा.आवरया तालुका जिल्हा इटावा, उत्तर प्रदेश (हल्ली मुक्काम तिसगाव) याला लागला. त्यामुळे त्याचा पाय तुटून पंधरा ते वीस फुटावर जाऊन पडले. त्याला उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. तसेच या घटनास्थळा जवळ असलेल्या दुकानात काम करणारा सचिन केशव भालेराव याच्या पायाला मार लागून तो जखमी झाला.

घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत पाण्याचा करून टँकरला लागलेली आग नियंत्रणात आणली. दरम्यान एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोनि रामेश्वर गाडे यांच्यासह वाळूज वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी घटना स्थळी धाव घेत टँकर चालक खंडू अनिल गवळी (40), रा. पंचमुखी महादेव मंदिर, बजाजनगर व एजन्सीचे व्यवस्थापक गजानन मधूकर खरबळ रा. वडगाव को गट नं 10 यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

स्फोटामुळे पत्रा उडून विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारा व केबल वायर तुटल्या. यामुळे विजपुरवठा खंडित झाला होता. पोटामुळे उडालेला एक मोठा पत्रा सुदैवाने विद्युत तारेला लागला. तो तारेला लागला नसता तर शेजारील कंपनीत पडून अनेक कामगार जखमी झाले असते.     

या भीषण स्फोटात जखमी झालेला रफिक शेख हा वेदनेने विवळत होता. अनेकांनी अनेकदा 108 रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र रुग्णवाहिका आलीच नाही. शेवटी प्रवीण रामकृष्ण त्रिवेदी या ट्रान्सपोर्ट चालकांनी स्वतःची कार देऊन जखमी रफिकला घाटीत रवाना केले.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार चौकालगत असलेल्या वाहन तळातील अनेक मोकळ्या भूखंडावर तसेच गार्डनच्या जागेवर अनेकांनी कब्जा केला असून विविध लहान-मोठे व्यवसाय थाटले आहेत. त्यात छोटे-मोठे गॅरेज व वेल्डिंगच्या दुकाना आहेत

या भीषण स्फोटामुळे टँकरचे पत्रा पत्रे कित्येक दूर उडाले. ते वेगवेगळ्या कंपनीत जाऊन पडल्याने परिसरातील डब्ल्यू 71 येथील दर्शन प्लास्टिक, एक्स सेक्टर मधील पाटील ट्रान्सपोर्ट, डब्ल्यू 72 जानकी इंजीनियरिंग, वैष्णवी इंजीनियरिंग आदींचे खिडक्या फुटल्या असून कंपनीतील टेबल, खुर्च्या तुटून सोफासेट इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *